HomeUncategorizedअंबड लिंकरोड परिसरात अनधिकृत दारू व्यवसाय गांजा व व्हाईटनरची विक्री बंद करा...

अंबड लिंकरोड परिसरात अनधिकृत दारू व्यवसाय गांजा व व्हाईटनरची विक्री बंद करा : नागरिकांची मागणी

नाशिक प्रतिनिधी 

अंबड सातपुर लिंक रोड परिसरात लहान मुले गांजा व व्हाईटनर चे व्यसनाधिन झाले तर अनधिकृत दारू व्यवसाय .गांजा व व्हाईटनरची विक्री बंद करण्यासाठी कारवाई करावी या मागणीचे निवेदन चुंचाळे पोलिस चौकीचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना शिंदे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले .
निवेदनात म्हटले आहे की प्रभाग क्रमांक २६ मधील अंबड सातपुर लिंक रोड वरील पेट्रोल पंप समोरील अनधिकृत दारु विक्री होत असल्यामुळे येथील नागरीकांना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील बालक व्यसनाधिन झाले आहे व अनेक महिलांचे परिवार उध्वस्त होत आहेत. तसेच तेथे होणाऱ्या दारु व अंमली पदार्थ विक्री मुळे तेथील नागरीकांना वावर करणे हे जोखमीचे झाले आहे. परिसरात सर्रासपणे गांजा व व्हाईटनरची विक्री होत आहे त्यामुळे लहान मुले त्याच्या आहारी गेलेत व्यसनाधिन झालेत. लहान मुलांना मिळणारे अंमली पदार्थ कुठुन येतात व कसे उपलब्ध होतात याची आपण सखल चौकशी करावी. तरी आपण ह्या प्रकरणारत त्वरीत लक्ष देवून हे व्यवसाय बंद करावे. या बाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील आपण ह्या प्रकरणात पोलिसांनी कुठलीही कार्यवाही झाली नाही. तरी त्वरीत कार्यवाही करून धंदे बंद करावे अन्यथा प्रभागातील नागरीकांना घेवुन आचार संहिता संपल्या नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तसेच सदर दारु धंदे टपऱ्या व अतिक्रमण करुन महानगर पालिकेच्या जागेत सुरु आहे. तरी महानगर पालिका आयुक्त यांनी त्वरीत हे अतिक्रमण काढावे या ही साठी आपण पन्न व्यवहार करावा अशी मागणी केली आहे या वेळी माजी नगरसेवक भागवत आरोटे सह सागर बोरसे अरुण कुशारे राम पाटील अशोक चव्हाण अतुल अडांगळे आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version