HomeUncategorizedसुरगाणा पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर छापेमारी

सुरगाणा पोलिसांच्या नाकावर टिच्चून स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर छापेमारी

नाशिक प्रतिनिधी

सुरगाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा मारत १ जणांलख ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुरगाणा शहरातील धिरज टेक्सटाईल सेंटर च्या समोर बांगड्याचे दुकानाच्या आडोशाला मिलन नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह या जुगार अड्ड््यावर छापा टाकला.यावेळी जुगार खेळतांना केशव धनाजी देशमुख (वय ३०.रानपाडा.सुरगाणा ) याला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.यावेळी रोख ५ हजार ८४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या मटका जुगार अड्ड्यावर धाडी टाकून मटका जुगार अड्डा चालकांच्या मनात धडकी भरली आहे. अशीच कारवाई सुरू ठेवण्याचा मानस पोलिसांनी व्यक्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक गणेश मस्के, हेमंत पाटील यांच्यासह पो. हवा. घुगे, प्रविण सानप, किशोर खराटे, चेतन सवंत्सकर पो.ना. देविदास गोविंद, किशोर बोडके,पो.शि. जाधव,महाले यांनी केली आहे.

स्थानिक गुन्हेच्या पोलिसांना जमते ते स्थानिकांना का नाही…

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे टाकले त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू जुगार धंदे करणारे सापडले. त्यामुळे बाहेरच्या अधिकार्‍यांना जर कधी तरी येऊनही या कारवाया सहजशक्य होत असतील तर मग स्थानिक रात्रंदिवस येथे कार्यरत असणार्‍या पोलिसांना या बाबी माहीत असुनही कारवाया होत नसल्याने स्वाभाविकच सामान्यांच्या मनात प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version