HomeUncategorizedमालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कायदेशीर कारवाई सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार...

मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कायदेशीर कारवाई सुरगाणा नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांचा इशारा

सुरगाणा प्रतिनिधी

नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत थकबाकी त्वरित भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित मालमत्ता धारकावर रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी दिली. सुरगाणा नगरपंचायतच्या वतीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी पटेल यांचे मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सूरू करण्यात आली आहे. सुरगाणा नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जे थकबाकीदार मालमत्ता व पाणीपट्टी भरणा करणार नाही अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रा प्रसिद्ध करणे या सह कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कर भरण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नगरपंचायत वसुली विभाग सर्व सूरू राहणार आहे. तरी थकबाकीदारांनी कराची रक्कम भरून होणारे संभाव्य कार्यवाही टाळावी व नगरपंचायत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी पटेल यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version