Homeधार्मिकउंबरठाण महाविद्यालयात आदिवासी संस्कृती व साहित्य संवर्धन कार्यशाळा

उंबरठाण महाविद्यालयात आदिवासी संस्कृती व साहित्य संवर्धन कार्यशाळा

विशेष प्रतिनिधी | बोरगाव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी विकास विभाग आणि डांग सेवा मंडळ संचलित उंबरठाण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय आदिवासी संस्कृती व साहित्य संवर्धन कार्यशाळा पार पडली. पावरी वाद्य प्रशिक्षक चिंतामण चौधरी यांनी कार्यशाळेत प्रात्यक्षिक स्वरूपात विविध स्वरांमध्ये पावरी वादन केले. विद्यार्थ्यांनी पावरीच्या स्वरावर आनंदाने नृत्य सादर केली. पावरी हे आदिवासी संस्कृतीतील प्रथम वाद्य असून सर्व वाद्यापैकी मौल्यवान आहे. नऱ्या, डवली, बांबू, बैलाचे शिंग, मेण अशा नऊ वस्तूंपासून पावरी तयार होते. ही वाद्य आज दुर्मिळ होते चालेली आहेत. याकलेचे अंगीकरण तरुणानी केले पाहिजे. पावरी वादन कसे केले जाते, त्यांचे अनेक पैलू विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी मार्गदर्शक प्रा. एकनाथ आहेर यांनी गोंदण हे आदिवासी संस्कृतीचे सौंदर्य, तर वारली चित्रकला हे महात्म्य होय. आदिवासी समाजाच्या स्वभावातील आपुलकी, वैविध्यपूर्ण कलागुण, निसर्गपूजन, समता दृष्टीकोन, भाषा, आहारविहार, सणउत्सव, नीतिमत्ता हा संस्कृतीचा सुवर्णक्षम ठेवा आहे. तो समजून घेऊन त्यांचे अभिमानाने संवर्धन केले पाहिजे. आदिवासी संस्कृती व साहित्य संवर्धन हे भविष्यकालीन जीवनासाठी मार्गदर्शक ठरेल. कार्यशाळेचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. सुभाष पवार यांनी केले. मधुकर गावित यांनी आभार मानले. प्रा. ज्योती येवले, प्रा. पूनम सूर्यवंशी यांचे कार्यशाळा यशस्वितेसाठी सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version