Homeक्राईममालेगावला युवकाचा खून करणारे दोन आरोपी गजाआड, पिस्टलही जप्त

मालेगावला युवकाचा खून करणारे दोन आरोपी गजाआड, पिस्टलही जप्त

नाशिक प्रतिनिधी

मालेगावं शहरात युवकाचा खून करणारे दोन आरोपी गजाआड करुन त्यांच्याकडून पिस्टलही पोलिसांनी जप्त केली आहे. शहरातील रमजानपुरा भागात सहा दिवसापूर्वी ओवाडी नाला परिसरात इब्राहिम खान इस्माईल खान या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना गजाआड केले आहे. हा खून झाल्यानंतर मालेगाव अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाने अधिक तपास करीत शेख युसूफ शेख कुरेशी व रियान शेख अशा दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांना पिस्टल पुरवणारा व मुख्य आरोपीला आपल्या दुचाकीवर पळवून घेऊन जाणा-या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेत त्यांना अटक केली. मयत व्यक्तीवर ज्या पिस्टल मधून गोळीबार केला ते पिस्टल व मोबाईल जप्त केले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरील खुनाचे गुन्हयात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, रमजानपुरा पो.स्टे. चे सपोनि ज्ञानेश्वर बडगुजर, स्थागुशाचे सपोनि हेमंत पाटील, पोउनि संदिप पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, पोना देविदास गोविंद, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, तसेच रमजानपुरा पो.स्टे. वे पोहवा दिपक खैरणार, पोना राजु चौधरी, सचिन वराडे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version