HomeUncategorizedइगतपुरी जवळ मुंबई आग्रा महामार्गावर 21 लाखांचा गुटखा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची...

इगतपुरी जवळ मुंबई आग्रा महामार्गावर 21 लाखांचा गुटखा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक प्रतिनिधी

नाशिक ग्रामीण हद्दीत गेल्या वर्षभरात बंदी असलेल्या गुटख्याच्या विरोधात सक्तीच्या कारवाया सुरू असताना मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ एका ट्रक मध्ये बुधवारी पहाटे तब्बल एकवीस लाखांचा गुटखा पकडुन कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मालेगाव शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजदिरसिंग संधू यांना गुप्त माहितीद्वारे एका ट्रक मधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे कळले. त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांना माहिती देत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करण्याचे सांगितले. गुन्हे शाखेने तातडीची पावले उचलत अधिकारी व कर्मचारी यांनी एक पथक बनवत महामार्गावर सापळा रचला. बुधवारी सकाळच्या सुमारास वर्णन केलेला आयशर ट्रक क्र. डिडी ०१ एफ ९१०२ मुंबईच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी सदर ट्रक थांबवत झडती घेतली असता पाठीमागील बाजूस चाळीस मोठ्या गोण्या आणि सहा लहान गोण्यांमध्ये मिळून SHK ब्रँडच्या सुंगांधी तंबाखू मिश्रित आढळून आली. फिर्याद गुन्हे शाखेचे मनोज सानप यांनी देत गुन्हा दाखल केला. यात आरोपी अमृत भगवान सिंह रा. हिनोतीया मध्यप्रदेश,पूनमचंद होबा चौहान रा. सकारगांव मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून जप्त मुद्देमालसह एकूण ४६,२३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली के. पी. भोजने करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version