Homeताज्या बातम्याउंबरठाण महाविद्यालयात मतदारांमध्ये जनजागृती

उंबरठाण महाविद्यालयात मतदारांमध्ये जनजागृती

सुरगाणा प्रतिनिधी

लोकशाही परंपरांचे संवर्धन, नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती आणि सामाजिक विकासपूर्तीसाठी मतदान अधिकाराची जनजागृती व्हावी याकरिता २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने डांग सेवा मंडळ नासिक संचलित, कला व वाणिज्य उंबरठाण महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदारांसाठी प्रतिज्ञा, पोस्टर स्पर्धा, रील व्हिडीओ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व नवमतदार विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सामूहिकपणे मतदान प्रतिज्ञा घेतली. मतदान जनजागृती पोस्टर स्पर्धेत हेमा पवार, दुर्गा गांगोडे, भावना चौधरी व आशा वळवी या विद्यार्थिनींनी उत्स्पूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रभारी प्राचार्य डॉ.एकनाथ आहेर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.सुभाष पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मतदान अधिकार हे देशाप्रती राष्ट्रीय कर्तव्य असून नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. मतदार म्हणून अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था बळकट होईल. मुक्त व निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकीत प्रलोभन किंवा दबावाला बळी न पडता मताधिकाराचा उपयोग करावा. विवेकबुद्धीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते, हे मतदारराज्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सक्षम लोकप्रतिनिधी हेच राष्ट्राचे मुलआधार आहेत. ‘आपल्या एका मताने, काय असा फरक पडणार आहे. तरीही वाटते हक्क मतदानाचा, प्रत्येकाने बजावलाच पाहिजे! आपण सर्वांनी मिळून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रतिज्ञा करूयात असे आव्हान केले. या उपक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.एकनाथ आहेर, राज्यशास्त्र विभागप्रमुख सुभाष पवार, किशोर काळे, कलावती थवील, मधुकर गावित, हेमलता महाले, उमाताई देशमुख, अनिता कोळी, ज्योती येवले, पुनम सूर्यवंशी मंदीप राऊत, अनिल कदम, यशवंत राऊत तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version