Homeक्राईमचांदोरी चौफुली परिसरात 378 किलो गांजा जप्त; नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगिरी

चांदोरी चौफुली परिसरात 378 किलो गांजा जप्त; नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगिरी

नाशिक प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांचे आदेशान्वये विशेष पथकांची कारवाई सुरू आहे. दिनांक २५/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिक बाजूकडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयीत इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून, नाशिकच्या दिशेने येत असलेले इनोव्हा वाहन क. एम.एच.२०.सी.यु.७०७० थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवून नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. सदर वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला, परंतु ते मिळून आले नाही. पोलीसांनी नाशिक बाजूकडे जाणारे मार्गावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला असता, नाशिक शहरातील आर.टी.ओ. ऑफिस परिसरातील घुंगरू बारजवळ सदर वाहन बेवारस स्थितीत मिळून आले. सदर वाहनाची झडती घेतली असता. त्यात १२ प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण १८९ पाकीटांमध्ये सुमारे ३७,८३,२५०/- रूपये किंमतीचा ३७८ किलो ३२५ ग्रॅम गांजा मिळून आला. सदर कारवाईत इनोव्हा वाहन क्र.एम.एच.२०.सी.यु.७०७० यासह त्यात मिळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण ६२,९०,२५०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version