Homeक्राईमदुचाकी चोरांकडून 17 चोरीचे गुन्हे उघड

दुचाकी चोरांकडून 17 चोरीचे गुन्हे उघड

पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

नाशिक प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच ग्रामीण हद्दीतून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चोरी गेलेल्या गाड्यांचा शोध घेत चोरट्यांचा देखील बंदोबस्त करावा अशी मागणी पीडित नागरिक तसेच माध्यमांकडून कायमच केला जात आहे याची दखल घेत नाशिक शहर आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करत लवकरात लवकर चोरट्यांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल करण्यासंदर्भात सुचित केले, या दिशेने सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यासंदर्भात खबऱ्यांमार्फत तसेच रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना तपासण्यास सुरुवात केली. दि. 14/12/2023 रोजी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक रात्री गस्त करत असताना मेरी शासकीय ऑफिसच्या गेट समोरून दोन इसम विना नंबर प्लेटची घेऊन जाताना दिसले पथकातील कर्मचाऱ्यांना या दोघांचा संशय आल्याने त्यांनी त्यांना हटकले असता त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता या दोघांना गाडी सहित ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रथम तर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली असता गुन्हे शोध पथकाला अधिक संशय आल्याने दोघात संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्यात घेऊन येत त्यांच्याकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास करण्यात आला यावेळी त्यांनी त्यांच्या ताब्यातील विना नंबर प्लेटची गाडी दिंडोरी रोड वरील तारवाला नगर येथील महाराणा बियर बार जवळील वक्रतुंड हाइट्स बिल्डिंग च्या समोरून चोरी केली असल्याचे कबूल केले, या संशयतांची नावे विचारली असता यश राकेश मांडवडे वय 19 वर्ष रा. चवगाव, नामपुर रोड, चवगाव पहिला फाटा, ता बागलाण सटाणा, जिल्हा नाशिक व प्रशांत एकनाथ गावित वय 19 वर्ष रा. बाबापूर पोलीस स्टेशन मावडी, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक असे सांगितले या दोन्ही चोरट्यांकडे अधिक विचारपूस केली असता शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन मसरूळ भद्रकाली पोलीस स्टेशन शहराद्दीतून तसेच ग्रामीण हद्दीतील दिंडोरी पोलीस ठाणे वणी पोलीस ठाणे येथून देखील वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले असता यश मांडवडे या चोरट्याने त्याच्या राहत्या घराजवळून चोरी केलेल्या मोटरसायकल ठेवल्या असल्याचे सांगतात सदर ठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकल हस्तगत करत, या दोन चोरट्यांकडून 17 मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी केल्याने शहर आयुक्त संदीप कर्णिक यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, काकड, गुंबाडे, नाईक, शिंदे, महेश नांदुर्डीकर, कोरडे, चव्हाण, भोईर, मालसाने, लोणारे, शिंदे, महाले, जाधव, परदेशी, खांडेकर, पवार, पचलोरे, साबळे, या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून यापुढे देखील अशाच प्रकारच्या कारवाया अपेक्षित असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version