Homeताज्या बातम्यानाशिकरोड पोलिसांची कार्यतत्परता आणि प्रसंगावधान

नाशिकरोड पोलिसांची कार्यतत्परता आणि प्रसंगावधान

यापूर्वी कधीही अशी पोलिसिंग अनुभवलेली नाही

नाशिक/मायकल खरात

मोबाईल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत, ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरू लागली आहे, रिक्षा असो एसटी महामंडळाची बस असो रेल्वे असो या सर्व गर्दीच्या ठिकाणी रोज कुठल्या ना कुठल्या प्रवाशाची मौल्यवान चीज वस्तू दागिने बॅग किंवा मोबाईल चोरीच्या घटना रोज घडतच आहेत बरं मोबाईल चोरी झाल्याबाबत तक्रारदार ज्या वेळेला पोलीस ठाण्यात जातो त्याचा अनुभव हा सर्वश्रुतच आहे आणि मग पोलीस ठाण्यातील पोलिसांचं नेहमीप्रमाणे ठरलेलं उत्तर मोबाईल आमच्याच हद्दीत हरवला असं तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही आणि तुमचा मोबाईल हरवल्या बाबत तुम्ही अमुक दुसऱ्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी नाहीतर दुसरे उत्तर हे तर कायमचं ठरलेलं आहे चोरी झालेला मोबाईलची देखील गहाळ म्हणूनच तक्रार घेतली जाते त्याचा ठरलेला फॉरमॅट हा पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एखाद्या झेरॉक्सच्या दुकानात किंवा पान टपरीवर उपलब्ध असतो त्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ झाल्या बाबतचा अर्ज भरून पोलीस ठाण्यात जमा करायचा मग पुढे काय मोबाईल सापडत नाही आणि तक्रारदाराला न्याय मिळत नाही असा आज वरचा जवळपास सर्वांचाच अनुभव आहे मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनसामान्यांमध्ये नाशिक पोलिसांबद्दल एक वेगळा अनुभव दिल्याने समाधान व्यक्त करण्यात आले त्याचे झाले असे नाशिक सीबीएस येथून सिन्नर कडे जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन बस निघाली रस्त्यात बस मधून प्रवास करत असताना एका विद्यार्थिनीला तिचा मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आले तिने लागलीच बस मधल्या वाहक आणि चालक यांना याबाबत कल्पना दिली गाडीतील इतर प्रवाशांना देखील आव्हान करण्यात आले की जर चुकून कुणाकडे मोबाईल आला असेल तर तो परत देण्यात यावा मात्र कोणीही मोबाईल सापडल्या बाबत न सांगितल्याने बस थेट नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झाली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून संबंधित विद्यार्थिनी व बस चालक, वाहक यांनी घडलेला प्रकार सांगितला मग काय वरिष्ठांनी लागलीच महिला कर्मचारी तसेच इतर अंमलदार यांना सहप्रवाशांची व त्यांच्या जवळील सामानाची झडती घेण्यास सांगितले गेलेला मोबाईल भेटला नाही परंतु नाशिक पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता व प्रसंगावधान राखत केलेले कारवाई याबाबत सर्वांनीच नाशिक पोलिसांचं कौतुक करत समाधान व्यक्त केले व अशा पद्धतीची मूळ पोलीससिंग सर्वसामान्यांना अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version