Homeताज्या बातम्याकोवळ्या वयात अती मद्यप्राशन तरुण मुकत आहेत जीवन

कोवळ्या वयात अती मद्यप्राशन तरुण मुकत आहेत जीवन

सुरगाणा तालुक्यातील दारुण वास्तव

सुरगाणा प्रतिनिधी

अति मद्य प्राशनाने सुरगाणा तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुण पिढी कुपोषित होत आहे. सुरूवातीला मजा म्हणून घेतला जाणारा दारूचा घोट पुढे चटक बनतोय. याचे भान पिणारालाही राहत नसल्याने अनेकांचे लिव्हर खराब होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या वर्षभरात काहीना लिव्हर डॅमेज होवून तर कांहीना हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.दारुच्या आधिकृत विक्रीने शासकिय तिजोरीत महसुली भर पडत असल्याने शासन स्तरावरून कायदेशीररित्या दारुबंदीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. तर गल्लीबोळात अनाधिकृतपणे बेकायदेशीर होणारी दारू विक्री चिरीमिरी देवून सर्रास सूरू असल्याने बेकायदेशीर गुत्यांना, टपरीधारकांना आळा घालण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्नही अनुत्तरित आहे. ग्रामसभांनी जरी दारूबंदी करण्याचा ठराव केला तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. वाढती लोकसंख्या आणि त्यातून वाढत जाणारी बेरोजगारी हे व्यसनाधीनता वाढीस लागण्याचे प्रमुख कारण बनू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version