Homeक्राईमदरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित दरोडेखोरांच्या येवला पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित दरोडेखोरांच्या येवला पोलिसांनी आवळल्या मुसक्या

येवला प्रतिनिधी

येवला तालुक्यातील नगरसूल शिवारातील नांदगाव रस्त्यावरील मुळूबाई घाटात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीपैकी दोन संशयितांना येवला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी या कारवाईत २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. येवला- नांदगाव रस्त्यावरील मुळूबाई घाटावर तालुका पोलिसांच्या पथकाला काही लोक संशयास्पदरित्या फिरतांना आढळले. पथकाने रामा पवार (४०, रा. तेरखेडा पारधी वस्ती), शंकर पवार (२३, रा. खामकरवाडी), नितीन पवार (रा. लक्ष्मीपेडी पारधी वस्ती) आणि अन्य संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यातील रामा आणि शंकर हे पोलिसांच्या हाती लागले. अन्य दोन संशयित पळून गेले. त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य, दरोड्यासाठी वापरण्यात येणारे वाहन असा २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. येवला तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version