Homeताज्या बातम्या६७ व्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्हीही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

६७ व्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्हीही संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

नाशिक प्रतिनिधी

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरू असलेल्या १७ वर्षे गटाच्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या आजच्या चवथ्या दिवशी बाद फेरीचे सामने खेळविले गेले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २८ संघापैकी १६ मुलांच्या आणि १६ मुलींच्या संघानी आपल्या गटवार साखळी सामन्यात चांगली कामगिरी करून बाद फेरीत प्रवेश मिळविला. या १६ संघामध्ये मुलांचे आठ उपउपांत्यपूर्व सामने खेळविले गेले, तर मुलीच्या विभागातही आठ उपउपांत्यपूर्व सामने खेळविले गेले. या बाद फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी विद्या भारती संघावर विजय मिळवत उपउपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. महाराष्ट्राने हा सामना एक डाव आठ गुणांनी जिंकला . या सामन्यात महाराष्ट्राच्या महाराष्ट्राकडून खेळताना तन्मय शेवाळेने एक मिनिट वीस सेकंद पळतीचा खेळ केला आणि आक्रमणामध्ये दोन गडी टिपले, शंकर यादवने दोन मिनिटं दहा सेकंद पळतीचा खेळ केला तर विलास वळवीने दोन मिनिट ५० सेकंद पळतीचा खेळ करत दोन गडीही टिपले, राज जाधवने पळतांना दोन मिनिट दहा सेकंद बचाव केला आणि तीन गडी बाद केले. भावेश माशेरेने पळतांना तीन मिनिट दहा सेकंद आपले संरक्षण केले. तर कृष्णा बनसोडे तीन गडी बाद केले. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संघाने तेलंगाना विरुद्ध खेळतांना २४ विरुद्ध ०२ अश्या तब्बल २२ गुण आणि एक डाव अश्या मोठ्या फरकाने जिंकून आपल्याकडून असलेल्या अपेक्षा खऱ्या ठरविल्या. महाराष्ट्राकडून खेळताना कर्णधार सुषमा चौधरीने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून पळतांना तीन मिनिट दहा सेकंद बचाव केला आणि आक्रमणामध्ये चार गडी बाद केले. रोहिणी भवर हीने पळतीचा खेळ करतांना तीन मिनिट पन्नास सेकंद आपला बचाव केले आणि पाच गडी टिपले, सानिका चाफे हीने दोन मिनिटे नाबाद बचाव करतांना आक्रमणांमध्ये चार गडी बाद केले. तर अमृता पाटीलने चार गडी बाद केले. अन्य उपउपांत्यपूर्व सामन्यात मुलांमध्ये केंद्रीय विद्यालय संघटन संघाने तेलंगणाचा पराभव केला. राजस्थानने बिहारवर मात केली, केरळ संघाने हरियाणाला, उत्तर प्रदेशने मणिपूरला, दिल्लीने पंजाबला, कर्नाटकने पॉन्डिचेरीला तर गुजराथने झारखंड संघाला पराभूत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मुलींच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात आंध्र प्रदेशने केरळ संघाला पराभूत केले, गुजराथने बिहारला, हरियाणाने राजस्थानला, पंजाबने पॉण्डिचेरीला, कर्नाटकने मणिपूरला, ओडिसाने छत्तीसगडला, तर दिल्लीने तामिळनाडूला पराभूत करून उपउपांत्य फेरी गाठली. स्पर्धांच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी स्कूल गेम्स ऑफ इंडियाचे निरिक्षक के. एस.मूर्ती आणि कु. कनक चतुर्धर आणि तांत्रिक समिती प्रमुख शरद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. तर क्रीडांगणाची जबाबदारी मंदार देशमुख, उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते यशस्वीरीत्या पार पडत आहेत. स्पर्धेच्या उत्कृष्ठ आयोजनासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सानंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टीळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संजय ढाकणे, महेश पाटील आणि त्यांचे सहकार परिश्रम घेत आहेत.

उपांत्य फेरीमध्ये मध्ये दाखल झालेले संघ 
मुले – महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजराथ, केंद्रीय विद्यालय संघटन, कर्नाटक, दिल्ली, केरळ, राजस्थान.
मुली – महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, गुजराथ, हरियाणा, ओरिसा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version