Homeताज्या बातम्याजय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याच्या तयारीला वेग !

जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याच्या तयारीला वेग !

श्रीराम कथेचे १७ डिसेंबर पासून आयोजन..

परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत होणार सोहळा..

नाशिक : प्रतिनिधी

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरातील कुंभमेळा मैदानावर १७ ते २४ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या भव्य सोहळ्या प्रसंगी श्रीराम कथा, जपानुष्ठान, यज्ञ यांसह विविधांगी भरगच्च कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे. कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने व प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील कुंभमेळा मैदान येथे १७ ते २४ डिसेंबर दरम्यान जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायनाचार्य ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर वाणीतून १७ डिसेंबर पासून रोज १२ ते ३ वाजेदरम्यान श्रीराम कथा संपन्न होणार आहे. महाजपानुष्ठान, १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ, अखंड नंदादीप,हस्त लिखित नामजप, नामसंकीर्तन, अभिषेक,भागवत पारायण तसेच रोज पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्य नियम विधी, महाआरती,भागवत वाचन,ध्यान प्राणायाम,सत्संग,श्रमदान यांसह भरगच्च कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून कुंभमेळा मैदानावर जमीन सपाटी करण करून भव्य-दिव्य स्वरूपात मंडप उभारणी कार्य सुरू आहे. कार्यक्रमस्थळी अनेक धर्म ध्वज उभारण्यात आल्याने कुंभमेळा मैदान आता पासूनच गजबजू लागले आहे.

पुण्यप्राप्ती बरोबरच मुख्यतः

व्यसनमुक्त समाज व संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्या प्रसंगी हजारो भाविक आठवडाभर निवासी राहून मौनव्रतात जपानुष्ठान करणार असून अखंड जप साधना करणार आहेत. कार्यक्रमात ५३ तालुक्यातील भाविकांचा सहभाग असणार आहे.कार्यक्रमारम्यान येणाऱ्या भाविकांसाठी शेकडो क्विंटल साखरे पासून बनवलेल्या बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमात जय बाबाजी भक्त परिवाराच्या राज्य व राज्याबाहेरील असलेल्या विविध आश्रमातील सेवक व गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. देश-विदेशातील संत व विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version