Homeक्राईमट्रक चालकासह ट्रक मालकाच्या भावाचे अपहरण

ट्रक चालकासह ट्रक मालकाच्या भावाचे अपहरण

नाशिकरोड ला गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी

मागील आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून नाशिक साखर कारखाना येथून एका ट्रकसह चालक व ट्रक मालकाच्या भावाचे अपहरण केल्याची घटना घडली. नाशिकरोड पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवून ट्रकचालकाला शोधून काढले; मात्र मालकाचा भावाचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चिमणीबारव येथील युवराज पांडुरंग पोळ यांच्या मालकीचा ट्रकमधून (एमएच१२ एचडी ००९४) हा नाशिक साखर कारखान्यावर ऊसाची वाहतूक केली जाते. ट्रकचालक बाळासाहेब दिलीप बोहुडे व ट्रक मालक युवराज पोळ यांचा भाऊ अपहृत योगीराज पांडुरंग पोळ हे गेल्या २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता इगतपुरी तालुक्यातील भरवीर साकुरफाटा येथून ट्रकमध्ये ऊस भरून नाशिक साखर कारखाना येथे उतरविण्यासाठी आले होते. सायंकाळपासून पाऊस पडत असल्याने ट्रकमधील उसाचा माल खाली करता येऊ शकला नव्हता. दुसऱ्या दिवशी २९नोव्हेंबरला दुपारी कारखाना सुरू झाल्यानंतर रात्री ट्रकमधील ऊस कारखान्यात खाली करून चालक बोहुडे व पोळ हे बाहेर ट्रकमध्ये डिझेल भरण्यासाठी गेले होते. त्यानंतर चालक व भावाचा कुठलाही संपर्क पोळ यांचा होत नव्हता. मध्यरात्री ट्रकचालक बाळासाहेब बोहुडे याच्यासोबत पोळ यांच्याशी संपर्क झाला होता.

       चौघांची टोळी; संगमेनरला सापडला ट्रक

बोहुडे यांनी ट्रक मध्ये रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डिझेल भरल्यानंतर त्यांचा ट्रक संशयित सुभाष बाळासाहेब खेमनर (रा. साकुर), शिवाजी कुदनर, पारानी कुदनर (दोघे रा. शिंदोडी, संगमनेर) व आणखीन एक साथीदार अशा चौघा जणांनी ट्रक रोखला. ‘तुमचा मागील आर्थिक व्यवहार बाकी आहे, आत्ताच्या आत्ता पैसे द्या असे म्हणून ट्रकसह बोहुडे, पोळ यांचे अपहरण केले होते. पोलिसांनी हा ट्रक गजानन साखर कारखाना संगमनेर येथून ताब्यात घेतला. यानंतर चालक बाळासाहेब बोहुडे यांचा शोध लावला. मात्र योगीराज पोळ याचा शोध लागला नसल्याचे नाशिकरोड पोलिसांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version