HomeUncategorizedमुळापर्यंत गेल्याशिवाय प्रतिबंधित गुटखा बंद होऊ शकत नाही

मुळापर्यंत गेल्याशिवाय प्रतिबंधित गुटखा बंद होऊ शकत नाही

नाशिक प्रतिनिधी

राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला विक्रीला बंदी आहे. असे असतानाही शहर-जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होते आहे. प्रतिबंधित गुटख्याविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई करीत आत्तापर्यंत कोट्यवधींचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तरीही चोरीछुप्यारीतीने विक्री सुरू आहे. या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या विळख्यात तरुणाई सापडलेली आहे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखा गंभीर आजार बळावतो, हे एव्हाना समाजाला ठाऊक झालेले आहे. तरीही या पदार्थांची सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विक्री केली जाते. नाशिक शहर व ग्रामीण भागात पोलिसांनी सातत्याने याविरोधात विशेष मोहीम राबवून कारवाईही केली आहे. आत्तापर्यंत शहर-जिल्ह्यातून पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करीत तब्बल साडेचार ते पाच कोटींचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केलेला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या ७९५ जणांविरोधात गुन्हेही दाखल करीत लाखोंचा तंबाखूजन्य साठा जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांनीही जून ते नोव्हेंबर यादरम्यान २७२ गुन्हे दाखल करून तीन कोटी सात लाख ७१ हजार १४१ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर, दररोज दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही शेकडोंच्या घरात असून, त्यातूनही पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विक्री व साठा करणाऱ्या संशयिता विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहे. तरीही या प्रतिबंधित पदार्थांची विक्री थांबलेली नाही.

                अव्वाच्या सव्वा दराने विक्री

प्रतिबंधित गुटख्याची विक्री चोरीछुप्यारीतीने व्यावसायिकांकडून केली जाते. एका पुडीच्या किमतीपेक्षा तीन ते चार पटीने व्यावसायिकांकडून त्याची विक्री केली जाते. विशेषतः ठराविक पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, किरणा दुकानांवर याची सर्रासपणे विक्री होते. तर, दुसरीकडे ज्या विभागाकडे यावर कारवाई करण्याचे अधिकार आहे, तो अन्न व औषध प्रशासन विभागाच कारवाईबाबत उदासीन आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी शहरातील एका गुटखा किंगलाही अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version