Homeताज्या बातम्याअवैध दारूविक्री जोमात; उत्पादन शुल्क विभाग मात्र कोमात !

अवैध दारूविक्री जोमात; उत्पादन शुल्क विभाग मात्र कोमात !

नाशिक प्रतिनिधी

बनावट, हरियाणा दमण येथे उत्पादित झालेली तसेच हातभट्टीच्या दारूबरोबच विनापरवाना दारू विक्रीने त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण अभोणा, दिंडोरी,देवळा,सटाणा सुरगाणा तालुक्यात उच्छाद मांडला आहे. बेकायदा दारू विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जबादारी सोपविली असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र याच खात्याकडून अवैध तसेच बनावट दारू विक्रीला प्रोत्साहन देण्यात येउन दरमहा लाखो रूपयांची वसुली केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग पुरवठादारावर मोठी कारवाई करील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तडजोड करण्यात येउन तगडा हाप्ता ठरवून घेण्यात आल्याची धक्कादायक चर्चा सुरू झाली आहे ! त्यामुळे अवैध दारू विक्री कडे राज्य उत्पादन शुल्क मात्र त्याकडे साईस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या वर्षभरात स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून हातभटटी तसेच अवैध दारू विक्रीवर कारवाई केली. त्या तुलनेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तालुक्यात कोठेही अस्तीत्व दिसले नाही. ठराविक कर्मचारी दरमहा अवैध दारू विक्रेते तसेच परवानाधारकांच्या भेटी घेउन हाप्ते वसुली करतात. तेवढेच अस्तीत्व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दिसून येते ते ही अवैध तसेच परवाना धारकांपुरते. सामान्य माणसाला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अस्तीत्वच दिसत नाही.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशिर्वादाने विविध परवानाधारक परमिट रूम मधून ग्राहकांची सर्सास लुट करण्यात येत आहे. एम आर पी पेक्षा कितीतरी अधिक पैसे उकळण्यात येत असून त्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत आहे. वास्तवात शोध घेतल्यास अनेक रथी-महारथींना एक्साईजने दिलेले अभय स्पष्ट होईल. त्यामुळे शासनाचा पगार घेणाऱ्या एक्साईजने मिठाला जागावे हीच अपेक्षा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version