HomeUncategorized22 लाखाचा गुटखा तपासणी नाक्या जवळ जप्त

22 लाखाचा गुटखा तपासणी नाक्या जवळ जप्त

जळगांव प्रतिनिधी 

मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी 22 लाख 60 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आलेला आहे . एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकप गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की राज्यात प्रतिबंधक तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला बंदी आहे . पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलोरो पिकप गाडी एम एच १९ सी वाय 5338 विक्री वितरण व साठा करण्यास प्रतिबंध असलेल्या गुटखा याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ संशयित आरोपी प्रेमचंद हरिराम पंजवानी राहणार सिंधी कॉलनी चोपडा रोड अंमळनेर हा मिळून आला. बोलोरो गाडी मधून 3 लाख 96 हजाराचा किंग केशर युक्त विमल पान मसाला चे 2000 पाकीट ,11 लाख 22 हजार रुपये केसर युक्त विमल पान मसाल्याचे एकूण 6000 पाकिटे, 44 हजार रुपये किमतीचे किंग विमल तंबाखूचे एकूण 2000 पाकिटे, एक लाख 98 हजार रुपये सहा हजार तंबाखूचे पाकिटे व पाच लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी असा एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एका आरोपीला अटक केलेले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरेकर हे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version