Homeताज्या बातम्यापांगारणे येथील आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका द्या उपजिल्हाधिका-यांना निवेदन

पांगारणे येथील आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका द्या उपजिल्हाधिका-यांना निवेदन

बोरगांव प्रतिनिधी 

सुरगाणा तालुक्यातील हडकाईचोंड येथील आदर्श आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश महाले यांनी विविध मागण्यांसाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. एक तर मागण्या मान्य करा अन्यथा ७ डिसेंबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा निवेदनातून देण्यात आला. या मागण्यांमध्ये पांगरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिका, वन हक्क मान्यता मिळावी, गोंदुणे ग्रामपंचायतीचे विभाजन करावे, उंबरठाणला ग्रामीण रुग्णालय, गोंदुणे ग्रामपंचायत निधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, गोंदुणे ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाइपलाइनच्या अर्धवट केलेल्या कामाची चौकशी करत संबंधितावर गुन्हा दाखल करावा, हडकाईचोंड येथे सिमेंट बंधारा बांधावा, ‘हर घर जल’ योजना राबवावी, आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करू नये. उलट आदिवासींच्या हक्कांचे ७ टक्के असून त्यामध्ये ३ टक्के वाढवून १० टक्के करण्यात यावे. या मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गुजरात राज्यास जोडा.,अन्यथा ७ डिसेंबरपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तुळशीराम खोटरे, शंकर चौधरी, दीपक मेघा, अजित भोये यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version