Homeताज्या बातम्याआयडीयाझम संस्थेच्या मदतीने दोन कुटुंबाच्या संसाराला मिळाला आधार..

आयडीयाझम संस्थेच्या मदतीने दोन कुटुंबाच्या संसाराला मिळाला आधार..

खोकरविहीर प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील हनुमंत पडावी व जांभूळपाडा येथील केंगा यांचे यांच्या घराला आग लागली होती. या आगी मध्ये संसार उपयोगी सर्व साहित्य जळाले,घर जळून अतोनात नुकसान झाले. घरातील सर्व वस्तू , धान्य, कागदपत्रे, कपडे जळून गेले.यात पाडवी परिवारातील करता पुरुष यांचा जीव गमवावा लागला अशी जीवित हानी या आगीने केली. या कुटुंबांचा संसार पुन्हा उभा रहावा यासाठी आयडीयाझम संस्थेने समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आव्हान केले होते. प्रभावती प्रकाश सगभोर, वाकी, (अकोले) यांनी स्वयंपाकाची भांडी, कपडे, ब्लँकेट, साड्या, स्वेटर इ. साहित्य संस्थेस दान केले. आयडीयाझम संस्थेचे नारायण गभाले, संकेत बिडगर यांनी कुटुंबाची भेट घेवून सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर या दोन ही कुटुंबांना त्यांचा संसार पुन्हा नव्या दमाने उभा रहावा, यासाठी संस्थेने सर्व साहित्य या कुटुंबांना मदतीचं आधार म्हणून दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण गभाले, सदस्य संकेत बिडगर, जलपरिषदेचे देविदास कामडी, हंसराज भोये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version