Homeक्राईमबापानेच मुलाची सुपारी देत घडवली हत्या

बापानेच मुलाची सुपारी देत घडवली हत्या

सागर मोर/ वणी

दारु पिण्यास सतत पैसे मागुन शिवीगाळ करुन नेहमी त्रास देणार्या मुलाच्या जाचाला कंटाळुन जन्मदात्या बापाने मुलाचा सुपारी देऊन खुन केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहीती अशी ,किशोर उर्फ टिल्लू रगु उशिर रा.खडकजांब ,ता.चांदवड याचा तीक्ष्ण हत्याराने खुन केल्याची घटना उघडकीस आली होती.22 नोव्हेंबर रोजी सदर युवाकाचा मृतदेह मौजे लोखंडेवाडी शिवार पालखेड धरणाचे भराव येथे आढळुन आला होता. सुरेश सुधाकर कांडेकर यांनी या विरोधात फिर्याद दिल्याने वणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा अज्ञाता विरोधात दाखल केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार नसताना व गुन्ह्याचे घटनास्थळावर वर्दळ नसताना याचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखा व वणी पोलिस असा संयुक्त तपास पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असताना याबाबतची महत्वाची माहीती पोलिसांना मिळाली.त्यात संदिप छगन गायकवाड व विधीसंघर्षीत बालक प्रथमेश ज्ञानेश्वर गायकवाड दोघे रा. खडकजांब ता.चांदवड या दोघांची चौकशी केली असता मयत किशोर उशिर हा त्यांचे वडील दगु जयराम उशिर यांचेकडे दारुसाठी दररोज पैसे मागत असे.पैसे दिले नाही तर शिवीगाळ दमदाटी करत असे.रोच्या त्रासाला कंटाळलेल्या धागु उशिर यांनी मुलगा किशोर उशिर यास संपविण्याचा निर्णय घेतला.व 18 हजार रुपयांची सूपारी संदिप गायकवाड व प्रथमेश गायकवाड यांना दिली. व खुन घडवुन आणल्याची धक्कादायक माहीती तपासात पुढे आली, संदिप गायकवाड याच्या पोलिस कोठडीतील तपासातील माहीतीनुसार दगु उशिर यांना ताब्यात घेण्यात आले.उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, सपोनि निलेश बोडखे ,पोऊनि महेश शिंदे व पोलिस पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी व कर्मचारी यांनी या घटनेचा छडा लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version