Homeताज्या बातम्याकेंद्राकडून गरिबांसाठी अनेक मोफत योजना सुरु - रावसाहेब दानवे, क्रेंद्रीय राज्यमंत्री

केंद्राकडून गरिबांसाठी अनेक मोफत योजना सुरु – रावसाहेब दानवे, क्रेंद्रीय राज्यमंत्री

गरिबांसाठी काम करणारे मोदी सरकार

अभोणा प्रतिनिधी

नागरिकांना विविध सेवा सुविधा मोफत केंद्रातील मोदी सरकार म्हणजे खरे गरिबांचे सरकार असल्याचे मत रेल्वे, कोळसा आणि खान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडले तालुक्यातील ग्रामपंचायत जुनीबेज येथे विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे हिरवा झेंडा दाखवून उदघाटन केले त्याप्रसंगी प्रसंगी श्री दानवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, उपजिल्हाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार,कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे ,शहराध्यक्ष निंबा पगार, शिक्षक आघाडी जिल्हाप्रमुख एस के पगार हे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री दानवे म्हणाले की, भारत हा देश गरिबांचा देश आहे. भारतात ८० कोटी लोक गरीब आहेत. त्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. राजीव गांधी यांच्या काळात केंद्रातून १०० रुपये पाठविले असता लाभार्थ्याला प्रत्येक्षात १५ रुपये मिळायचे मात्र मोदी सरकारच्या काळात योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्याचे पूर्ण रक्कम जमा होत आहे.गरीब नागरिकांना केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार काम करीत आहेत. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकार कोणकोणत्या योजना राबवित आहेत त्याची माहिती दिली जात आहे. या योजनांचा तळागाळातील जनतेने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हितेंद्र पगार हेमंत रावले, चेतन निकुंभ, काशिनाथ गुंजाळ, मोती वाघ, प्रभाकर निकम, दिनकर आहेर, विशाल गुंजाळ, अशोक बोरसे, गौरव पाटील, भिका वाघ, योगेश आहेर, बाजार समिती संचालक शितलकुमार अहिरे, जुणीबेज सरपंच सुनिल पवार, उपसरपंच संगीता बच्छाव, विजय खैरनार, भूषण बच्छाव, संजय बच्छाव, विनोद खैरनार, बाजीराव धनवटे, बळवंत बच्छाव, नवीबेज उपसरपंच मधुकर वाघ, नितीन पवार, प्रफुल बच्छाव उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीपणेपार पाडण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील , तहसीलदार वारुळे , सहायक गटविकास अधिकारी वंदना सोनवणे , विस्तार अधिकारी एस डी महाले , युवराज सोनवणे व ग्रामसेवक नितीन बच्छाव व कर्मचारी आदि प्रयत्नशील होते

संकल्प भारत यात्रा अंतर्गत – आयुष्यमान व आभा कार्ड, सी आय एफ निधी, बचत गटांना बँक कर्ज, जिपसेस मधून ट्रॅक्टर योजना, जिपसेस मधून विदयुत पंप योजना, बेबी केअर किट, लेक लाडकी योजनेस पात्र, पोषण किट, बेबी केअर किट,शबरी आवास योजना निवड झालेले लाभार्थ्यांना आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version