Homeअपघातकन्नड घाटात भाविकांच्या वाहनाला अपघात 4 जण ठार, सात जखमी

कन्नड घाटात भाविकांच्या वाहनाला अपघात 4 जण ठार, सात जखमी

जळगाव प्रतिनिधी 

कन्नड घाटात मध्यरात्रीनंतर तवेरा व अन्य वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले तर सात जण जखमी झाले आहेत.मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीचा अन्य वाहनासोबत जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के, (वय -६५); शिलाबाई प्रकाश शिर्के, (वय -६० ) ; वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी, (वय -३५) आणि पूर्वा गणेश देशमुख, (वय -०८) हे चार प्रवासी जागीच मयत झाले.

एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला.या अपघातात गणेश देशमुख,वय ३०; अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०); कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी,( वय १७ ); सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) ;.पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन, (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर, वाहनधारकांनी कन्नड घाटातून अतिशय सुरक्षितपणे वाहने चालविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version