HomeUncategorizedरोकडपाडा येथे 33‌ लाभार्थींना गॅस वाटप

रोकडपाडा येथे 33‌ लाभार्थींना गॅस वाटप

ठाणापाडा प्रतिनिधी 

सुरगाणा वनविभाग व वनक्षेत्रातील संयुक्त व्यवस्थापन समितीतर्फे तालुक्यातील रोकडपाडा येथील ३३ लाभार्थीना रविवारी लोकनियुक्त सरपंच अनिता पवार, सुरगाणा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजू पवार यांच्या उपस्थितीत रोकडपाडा येथे ७५ टक्के सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. ही याेजना २०११ पासून सुरू असून आत्तापर्यंत तालुक्यात बाऱ्हे, उंबरठाण, सुरगाणा व कनाशी कार्यालयातर्फे २०७८ आदिवासी लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. वनविभागाच्यावतीने ज्या भागात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. त्या भागातील जंगलतोड होऊ नये म्हणून सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात येते. सुरगाणा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने रोकडपाडा येथे वाटपप्रसंगी वनविभाग चे माळेगांव येथील वनरक्षक हरी गायकवाड, देविदास पवार, सखाराम सहारे, गोपाळ गावित, शांताराम गावित, आकी कडाळी, कैलास चौधरी, काशीनाथ गावित व लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version