Homeताज्या बातम्यासाहित्यरत्न काळाच्या पडद्याआड

साहित्यरत्न काळाच्या पडद्याआड

नाशिक प्रतिनिधी

  1. डॉ.शंकर बोऱ्हाडे साहित्य क्षेत्रातील एक लखलखणारा रत्न ज्यांनी आपल्या जीवन प्रवासात साहित्य क्षेत्राला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्याने साहित्य क्षेत्रासह त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या सहवासातील सगळेच त्यांच्या जाण्याने शोकमग्न झाले आहेत.
    डॉ.शंकर बोऱ्हाडे हे एक बहुचर्चित प्रसिद्ध साहित्यिक, लेखक होते. त्यांच्या जीवन प्रवासात त्यांच्या आयुष्यातील 40 वर्ष त्यांनी साहित्य क्षेत्राला अर्पण केले आहेत या प्रवासादरम्यान मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह), देशभक्त शेषराव घाडगे (चरित्र), वीडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र), उजेडा आधीचा काळोख (ललित) लोकपरंपरेचे सिन्नर, शोध डॉ. वसंतराव पवारांचा ही आयुष्यभर मार्गदर्शक संपत्ती म्हणून साहित्य प्रेमींना बहाल केली आहे. नाशिक मध्ये झालेले 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता यावेळी अनेकांना त्यांचा सहवास अगदी जवळून लाभला. येथील सार्वजनिक वाचनालयाचे देखील त्यांनी विश्वस्त म्हणून काम अगदी उत्तमपणे हाताळले होते. नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, यासोबतच वाचनाची व लिखाणाची आवड असणाऱ्या सर्वांनाच त्यांचं मौलिक मार्गदर्शन कायमच मिळत असे त्यांच्या जाण्याने एक चांगला साहित्यिक लेखकच नाही तर एक चांगला मार्गदर्शक व शिक्षक देखील गमावल्याचे बोलले जात आहे.
    बहुआयामी व्यक्तिमत्वास दैनिक सुरगाणा वृत्तांत कडून भावपूर्ण आदरांजली.

*शोकाकुल-*

प्रशांत हिरे
संपादक 9881763228

मायकल खरात
कार्यकारी संपादक
9145110443 / 9359261192

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version