Homeअपघातदुर्दैवी घटना:ट्रक आणि कारच्या अपघातात पाच तरुण जागीच ठार

दुर्दैवी घटना:ट्रक आणि कारच्या अपघातात पाच तरुण जागीच ठार

पुणे इंदौर महामार्गावरील घटना

मनमाड प्रतिनिधी

येथील अनकवाडी शिवारात पुणे-इंदौर महामार्गावर आज सायंकाळी ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यामध्ये कार मधील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की यामध्ये कार अक्षरश: चक्काचूर झाली होती. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले व स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचाव कार्य सुरू केले मात्र अपघात इतका भीषण होता की कार मधील कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. अपघातात मृत झालेले पाचही तरुण नाशिकच्या गंगापूर भागातील असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून यातील मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. MH-06-AN-8890 ह्या कार मधून पाच तरुण मनमाड कडे जात असताना अनकवाडे जवळ पुणे-इंदौर महामार्गावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला अपघातग्रस्त कार ट्रकच्या खाली येत चक्काचूर झाली होती यामध्ये प्रवास करणाऱ्या पाचही तरुणांचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावर स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले मात्र अपघात इतका भयावह होता की यामध्ये एकही तरुण वाचू शकला नाही. अपघातग्रस्त कारमधून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले व उत्तरीय तपासणीसाठी सर्व मृतदेह मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून आली असून मृतांची ओळख पटवण्यात आली असून यामध्ये दोन सख्या भावंडांचा देखील समावेश आहे, त्यांचे नाव ललित शरद सोनवणे व गणेश शरद सोनवणे रा. पेठ रोड, नाशिक. यांसह रोहित धनवटे श्रेयस धनवटे आणि प्रतीक नाईक असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत, या अपघातानंतर मृत तरुणांना पाहून हळहळ व्यक्त केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version