Homeक्राईमरेल्वेत बॅग लिफ्टिंग करणाऱ्या भुरट्यास युनिट एक ने केले जेरबंद

रेल्वेत बॅग लिफ्टिंग करणाऱ्या भुरट्यास युनिट एक ने केले जेरबंद

नाशिक प्रतिनिधी

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नजर चुकवून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या भुरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे तक्रारी अलीकडच्या काळात वाढल्या असून दि. 25/11/2023 रोजी मुंबईत राहणाऱ्या मेरी अल्वा यांनी भोपाळ येथून मुंबई येथे राणी कमलापती रेल्वे, बोगी नंबर 6 मधून जात असताना पहाटे 04.25वा एका अज्ञात चोरट्याने शोल्डर बॅग व त्यामध्ये असलेले 14 तोळे सोन्याचे दागिने व एक रियल मी कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत नाशिक रोड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना नाशिक शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार विशाल काठे यांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे बॅग लिफ्टिंग करणाऱ्या भुरट्यास ओळखले तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा भारत नगर येथे येणार असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विशाल काठे, म्हसदे, भांड, गायकवाड, अमोल कोष्टी, समाधान पवार, अशांनी सापळा रचून संशयित चोर आश्रप राऊत शेख वय 19 वर्ष रा. भारत नगर, वडाळा, पाथर्डी रोड, नाशिक यास शिताफिने पकडून जेरबंद केले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले मात्र पोलिसांनी विशेष कौशल्य वापरताच संशयित भुरट्यास अवघे विश्व डोळ्यापुढे आलं की काय असे भासू लागले व त्याने केलेला गुन्हा कबूल करत चोरलेला एकूण 8,65,918/- लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला संशयित आरोपीस पुढील कारवाईसाठी नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विशाल काठे, म्हसदे, भांड, गायकवाड, अमोल कोष्टी, समाधान पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version